

इचलकरंजी : गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गावभाग पोलिसांनी रेकॉर्डवरील ६८ गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई केली. यामध्ये ‘मोका’ कारवाईतील २० गुन्हेगारांचा समावेश असून, एसटी सरकार गँग, नेमिष्टे गँग, उमेश आरबोळे गँग, बी.के. गँग आणि केसरी गँगशी संबंधित गुन्हेगारांचाही समावेश आहे. गणेशोत्सव कालावधीत या सर्वांना हातकणंगले तालुक्यात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.
हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये गणेश बजरंग नेमिष्ठे, सूरज वाडकर, सौरभ ढोले, विनायक कुंभार, राजकुमार ऊर्फ बच्चन कांबळे, गणेश कांबळे, आदित्य निंबाळकर, प्रेम कांबळे, बालाजी ऊर्फ आकाश आवळे, सुमित कांबळे, अर्जुन भोसले, स्वप्निल तारळेकर, यश निंबाळकर, ओंकार ढमणगे, ऋतीक गवळी, समाधान नेटके, यश बनसोडे, आर्यन बनसोडे, दीपक कांबळे, सूरज शेख, अरसलान सय्यद, देवदास नेतले, ऋषीकेश शिंदे, अरविंद मस्के, राकेश कुंभार, इम्रान कलावंत, राहुल चव्हाण, आरिफ कलावंत, अभिजित जामदार, अक्षय नेमिष्ठे, सुंदर नेमिष्ठे, राजेंद्र आरगे, अजिंक्य जामदार, संजय तारदाळे, अर्जुन रानभरे, राजू आरबोळे, शेखर नाईक, सुशील ऊर्फ बाज्या कोरवी, अमन वडगावे, निखिल दुधाणे, साईनाथ वाडकर, समरजित पाटील, युवराज पाटील, राजू लोखंडे, आकाश सासणे, ओंकार ऊर्फ चिक्या काळे, सूरज सुतार, चेतन लवटे, सतीश पोळ, तौफिक राजत्रावर, आसिफ ऊर्फ आशपाक राजेन्नावर, चंद्रकांत ऊर्फ चंदू आळेकट्टी, राहुल केसर, अमोल ऊर्फ रवींद्र कमते, राहत मुजावर, राहुल आवळे, पिंटू ऊर्फ महादेव नंदनवडे, दयासागर हेगडे, भरमा पाथरवट, हैदरशाह मकानदार, जावेद पठाण, सलीम दंडीन, तोहित सावनुकर, समीर जमादार, प्रदीप कांबळे, सलीम शेख, सुरेश देवरशी आणि पवन गवळी यांचा समावेश आहे.