ऊस दरासाठी रविवारी चक्काजाम आंदोलन; राजू शेट्टींचा इशारा

ऊस दरासाठी रविवारी चक्काजाम आंदोलन; राजू शेट्टींचा इशारा

Published on

मुरगूड; पुढारी वृतसेवा : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मागील हंगामातील चारशे रुपये कारखानदाराकडे अडकले आहेत . ते बुडविण्याचे कारस्थान चालू आहे . त्यासाठी सर्वांनी एक जूट केली आहे पण स्वाभीमानी संघटना शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे वसूल केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही . त्यांचे नाक दाबा म्हणजे तोंड उघडेल यासाठी रविवारी ( (दि. १९ नोव्हेंबर ) चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा स्वाभीमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मुरगूडच्या हुतात्मा तुकाराम चौकात झालेल्या विराट जाहिर सभेत बोलताना दिला .

या सभेत बोलताना राजू शेट्टी म्हणाले ' मागील हंगामाचे चारशे रुपयाची मागणी संदर्भात व चालू गळीतासाठी ऊसाला प्रतिटन ३५०० रुपये दर मिळण्यासाठी आमचा लढा सुरु आहे . गेल्या गळीत झालेल१५ लाख शेतकऱ्यांच्या ३ कोटी टनाचे १२०० कोटी रुपये कारखानदारांकडे अडकले आहेत ते देण्यास त्यांच्याकडून टाळाटाळ होत आहे . लढा पुकारताच वेगवेगळी उत्तरे देवून वेळ मारून नेली जात आहे . चालू गळीत हंगामाचा दर यांनी संगनमताने ठरवून ३१०० रुपये जाहिर केला आहे . हे शेतकऱ्यांच्या हिताविरोधी आहे . शेतकऱ्यांनी घाम गाळून ऊस पिकवायचा आणि डल्ला यांनी मारायचा हे कोणत्या तत्वात बसते . तेंव्हा ऊस दरसाठीची ही लढाई यशस्वी करण्यासाठी कागलकरांनो सज्ज व्हा असे आवाहन करुन श्री शेट्टी म्हणाले , लोकसभा व विधानसभा निवडणूका एकमेकाच्या विरोधात लढणारे शेतकऱ्यांचे पैसे दयायची वेळ आल्यावर तिघे नेते एक होतात . ते शेतकऱ्यांना लूट त आहेत असा आरोप ना .मुश्रीफ , समरजित घाटगे ' खासदार संजय मंडलिक यांचे नाव न घेता राजू शेट्टीनी करीत रस्त्यावरून ऊसाचे एकही वाहन सोडायचे नाही असा सज्जड इशाराही त्यांनी दिला .

यावेळी साभीमानी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर म्हणाले , पालकमंत्र्यांच्या तालुक्यात सत्तेच्या जोरावर शेतकऱ्यावर दरोडयाचे गुन्हे दाखल केले जात आहेत व पोलीस शेतकऱ्यांना लूटणाऱ्यांना सरंक्षण देत आहे, हे चालू द्यायचे नाही . त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे .

सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शेतकरी सदाशिव भारमल होते . सभेत मारुतराव चौगले , नामदेवराव भराडे , महावीर मगदूम , संपत पाटील ( खेबवडे ) युवा अध्यक्ष शिवाजी कळमकर, परशुराम कदम (मत्तिवडे ), भुदरगड तालुकाध्यक्ष मायकेल बारदेसकर , सचिन खोत ( निपाणी ), भागवत शेटके ( करंजीवणे ) , पांडूरंग आडसूळ ( मळगे खुर्द ) , जोतिराम सुर्यवंशी पाटील ' तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांची भाषणे झाली .

स्वागत जगदीश गुरव यांनी केले समाधान हेंदळकर यांनी प्रास्ताविक केले . संदीप भारमल यांनी आभार मानले
कागल चळवळीचं विद्यापीठ !कागलंची राजकिय विद्यापीठ अशी ओळख आहे पण या तालुक्यात शेतकऱ्यांच्या अन्यायाविरुध्द लढण्यासाठी व लढा यशस्वी करण्यासाठी या तालुक्यात चळवळ व्हायला पाहिजे व कागल हे चळवळीचं विद्यापीठ आहे अशी नवी ओळख करुन देण्याचे आवाहन राजू शेट्टी यांनी केले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news