कोल्‍हापूर : गंगानगरात कोरोची व इचलकरंजीतील मराठा कार्यकर्त्यांकडून चक्‍काजाम आंदोलन | पुढारी

कोल्‍हापूर : गंगानगरात कोरोची व इचलकरंजीतील मराठा कार्यकर्त्यांकडून चक्‍काजाम आंदोलन

कबनूर : पुढारी वृत्तसेवा मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी हातकणंगले तालुक्यातील गंगानगर येथील पंचगंगा साखर कारखान्या जवळून यड्रावकडे जाणाऱ्या रस्त्यावर आंदोलन करण्यात आले. आज (बुधवार) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास इचलकरंजी व कोरोची येथील सकल मराठा समाज व मराठा संघटनांच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. कार्यकर्ते रस्त्यावरच ठिय्या मारुन बसल्याने व रस्ता रोखून धरल्याने सुमारे अर्धातास वाहतूक खोळंबून राहिली होती. यामुळे वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे, पण शासन आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेईना. यासाठी शासनाला जाग यावी म्हणून इचलकरंजी मधील चार प्रमुख नाक्यांच्या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून गंगानगर ता. हातकणंगले येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी कोरोची, इचलकरंजी येथील मराठा समाज कार्यकर्ते, संघटनाचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button