कोल्हापूर : टोप-कासारवाडी फाट्यावर ट्रकची दुचाकींना धडक; एकजण ठार तर एक गंभीर जखमी | पुढारी

कोल्हापूर : टोप-कासारवाडी फाट्यावर ट्रकची दुचाकींना धडक; एकजण ठार तर एक गंभीर जखमी

शिरोली एमआयडीसी; पुढारी वृत्तसेवा : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर टोप कासारवाडी फाट्यावर भीषण अपघाताची घटना घडली. ट्रकने तीन दुचाकीला दिलेल्या धडकेत कराड येथील एकजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी आहे. हा अपघात रविवारी (दि. १०) दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मयत विठ्ठल जयसिंग मोहिते (वय ५६), तर जखमी ओमकार रविंद्र जाधव (वय २२, रा. दोघेही घोनशी ता. कराड) हे टोप येथील कासारवाडी फाट्यावरून महामार्ग ओलांडत जोतिबा देवस्थानकडे जाण्यासाठी थांबले असता पुणेहून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने ( क्र. KA.05.AJ.5701) दुचाकीला (क्र. एम. एच. ५० आर २६ ५६ ) धडक दिली. ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला थांबलेल्या दुचाकीस देखील या ट्रकने धडक दिली. या अपघातात एक मयत झाला तर चार जखमी झाले आहेत. जखमींपैकी ओमकार गंभीर हा कराडचा रहिवासी आहे.  त्याच्यावर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहे.

या अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याने लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनास्थळी शिरोली पोलीस व महामार्ग पोलिसांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची नोंद शिरोली पोलिसात झाली आहे.

Back to top button