कोल्हापूर : नागांव फाटा येथे ट्रेलरच्या धडकेत तरुण ठार तर एक जखमी

कोल्हापूर : नागांव फाटा येथे ट्रेलरच्या धडकेत तरुण ठार तर एक जखमी

शिरोली एमआयडीसी; पुढारी वृत्तसेवा : पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर नागांव फाटा येथे भरधाव ट्रेलरने मोटरसायकलला पाठीमागुन जोराची धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात मोटरसायकलस्वार जागीच ठार तर एक जण जखमी झाला. हे दोघे सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक गावचे रहिवासी आहेत.

अपघातातील मयताचे नाव हर्षद सुनिल बुद्रुक (वय १९) तर जखमीचे सुजल रामचंद्र बागणे ( वय १९) असे आहे. हे दोघे आपल्या मोटरसायकलने (क्र. एम एच ०९ बी जी ४३१) कामानिमित्त हर्षदच्या मामाकडे इंगळी (ता. हातकणंगले) गावाकडे जात होते. ते नागाव फाटा चौकात आले असता पुणे कडून बेंगळूर कडे जाणाऱ्या ट्रेलर ( क्र. एम एच ४६ ऐ आर ७८३३) ची मोटरसायकला पाठीमागुन जोराची धडक बसल्याने दोघेजण खाली पडल्याने ट्रेलरचे चाक हर्षदच्या अंगावरून गेले. त्यामुळे हर्षदच्या शरिराचा चेंदामेंदा होऊन त्याचा जागी मृत्यू झाला तर सुजल हा मोटरसायकलच्या मागे बसल्याने तो धडकेत लांब फेकला गेल्याने ता जखमी झाला.

ट्रेलर भरधाव असल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला होता. ही धडक इतकी जोराची होती ट्रेलरच्या पुढील भागात मोटरसायकल अडकून शंभर फूट फरपटत नेली या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुक काही काळ ठप्प झाली. अपघातस्थळी शिरोली पोलिसानी धाव घेवून जखमीस व मयतात उत्तरीय तपासणी करता कोल्हापूर येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले त्यानंतर महामार्गावरील वाहतुक सुरळीत केली. या अपघाताची नोंद शिरोली पोलिसात झाली आहे. पुढील तपास सपोनि पंकज गिरी करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news