कोल्हापूर: गुडाळ येथे तालुक्यातील पहिल्या महिला एक्साईज इन्स्पेक्टरांच्या हस्ते ध्वजारोहण | पुढारी

कोल्हापूर: गुडाळ येथे तालुक्यातील पहिल्या महिला एक्साईज इन्स्पेक्टरांच्या हस्ते ध्वजारोहण

गुडाळ, पुढारी वृत्तसेवा: गुडाळ (ता. राधानगरी) येथील गुडाळेश्वर हायस्कूलच्या प्रांगणात शाळेची माजी विद्यार्थीनी आणि राधानगरी तालुक्यातील पहिली महिला एक्साईज इन्स्पेक्टर कु. निता चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ग्रामीण मुला-मुली मध्ये कष्ट, चिकाटी आणि जिद्द हे अंगभूत गुण आहेत .विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि सोशल मीडियाचा अतिरेक टाळून अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास यश दुर नाही असे प्रतिपादन कु. निता पाटील यांनी केले.

या वेळी शाळेचे मुख्याध्यापक पी. एल. पाटील, अध्यापक तानाजीराव कवडे ,सी. एल. पाटील यांच्यासह सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button