कोल्हापूर : राधानगरीतील दुर्गम भागातील निकेशला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक | पुढारी

कोल्हापूर : राधानगरीतील दुर्गम भागातील निकेशला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक

कौलव; पुढारी वृत्तसेवा : राधानगरी तालुक्यातील चौके या दुर्गम गावातील निकेश आनंदा डवरी याने नेपाळ मधील पोखरा येथे झालेल्या १९ वर्षाखालील ४०० मीटर आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धेत ४०० मीटर्स धावण्या मध्ये सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. त्याच्या या यशाने डोंगराळ व दुर्गम मातीतील गुणवत्तेला झळाळी आली आहे.

या स्पर्धेत भारत, श्रीलंका, नेपाळ व अफगाणिस्तान ह्या चार देशांनी सहभाग घेतला होता. युथ गेम फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने रौप्यपदक पटकावून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रवेश मिळवला होता. धामणी प्रकल्पामुळे बाधित झालेल्या चौके या दुर्गम गावात कोणत्याही प्रगत सुविधांशिवाय सराव करत त्याने हे लख्ख यश संपादन केले आहे. त्याने माध्यमिक शिक्षण घेत न्यू इंग्लीश स्कुल चौके या शाळेत धावण्याचे धडे गिरवले असून सध्या तो धामोड मधील सह्याद्री कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिकत आहे. प्रतिकुल परिस्थितीशी झुंजत निकेशने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे कौतुक होत आहे.

Back to top button