Latest
कोल्हापूर : ऐतिहासिक खासबाग मैदानाची भिंत ढासळली; दोन महिला अडकल्या | Kolhapur Khasbag Maidan Wall collapsed
कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरात आज (दि. २५) सायंकाळी खासबाग या ऐतिहासिक शाहूकालीन कुस्ती आखाड्याची भिंत कोसळल्याची घटना घडली. स्वच्छतागृहावर भितीचा काही भाग ढासळला. यामध्ये दोन महिला अडकल्या होत्या, यापैकी एका महिलेला सुखरुप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. (Kolhapur Khasbag Maidan Wall collapsed)
कोल्हापूर येथील केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये एका पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला जमल्या होत्या. यापैकी दोन महिला या स्वच्छतागृहात गेल्या असताना खासबाग कुस्ती आखाड्याची संरक्षक भिंत कोसळली. अग्निशमन दलाच्या जवानानी शर्तीचे प्रयत्न करून यातील एका महिलेला बाहेर काढले आहे. या महिलेला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.तर दुसऱ्या महिलेला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

