कोल्हापूर : कासारी नदी; पुराच्या पाण्यात शिरताच बैलजैडीने सोडले प्राण, मालक सुखरुप | पुढारी

कोल्हापूर : कासारी नदी; पुराच्या पाण्यात शिरताच बैलजैडीने सोडले प्राण, मालक सुखरुप

पन्हाळा; पुढारी वृत्तसेवा : कासारी नदीच्या पुराचे पाणी पाहून बिथरलेल्या बैलजोडीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. आज (दि. २४) दुपारी दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली. कसबा ठाणे येथे घडलेल्या या घटनेत सुदैवाने बैलजोडी मालकाला बचावले.

याबाबतीत अधिक माहिती अशी की, आज (दि. २४) दुपारी दीड वाजाताच्या सुमारास पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे येथे महादेव महाडिक हे आपल्या दोन बैलांना घेऊन कासारी नदी परिसरात गेले. छोट्या बैलगाडीला जुंपून ते बैलांना धुण्यासाठी गेले होते. नदीची पाणी पातळी वाढली असल्याने पूरपरिस्थिती निर्माण झालेली होती. पुराचे पाणी असूनही बैलजोडी मालकाने बैलगाडी पुढे नेली. दरम्यान पुराचे पाणी पाहून बैल बिथरले आणि बाहेर पडण्यासाठी धडपडू लागले. यावेळी दोन्ही बैलांचा गुदमरून मृत्यू झाला. सुदैवाने या घटनेत बैल मालक बचावले. या बैलजोडी मालकाचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Back to top button