अब्दुललाट मधील मुस्लिम बांधवांचा जैन समाजाने पुकारलेल्या भारत बंदला जाहीर पाठींबा

अब्दुललाट मधील मुस्लिम बांधवांचा जैन समाजाने पुकारलेल्या भारत बंदला जाहीर पाठींबा

अब्दुल लाट; पुढारी वृत्तसेवा : काही दिवसांपूर्वी बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील हिरकुडी या गावातील आश्रमातील जैन मुनी आचार्य 108 कामकुमार नंदीजी महाराज यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ आज (दि. २०) सकल जैन समाजाच्या वतीने भारत बंदची हाक दिली होती. अब्दुल लाट येथील मुस्लिम समाजाच्या वतीने देखील या घटनेचा जाहीर निषेध करत आजच्या भारत बंदला जैन मंदिर येथे मुस्लिम बांधवांच्या वतीने जाहीर पाठींबा देण्यात आला.

जैन मुनी आचार्य 108 कामकुमार नंदीजी महाराज यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ व गुन्हेगारांना कठोर शासन व्हावे, तसेच समाजात पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी सकल जैन समाजाच्या वतीने भारत बंदची हाक दिली होती. या अनुषंगाने अब्दुल लाट, शिरडवाद परिसरात अनेकांनी आपले व्यवहार बंद ठेऊन या बंदला प्रतिसाद दिला होता. सर्वात महत्वाचे म्हणजे आज अब्दुल लाट येथील मुस्लिम सुन्नत या हत्येच्या घटनेचा जाहीर निषेध करत भारत बंद साठी सर्व व्यवहार बंद ठेऊन जाहीर पांठिबा देत असल्याचे पत्र दिले जैन समाजातील पदाधिकारी यांच्याकडे दिले.

यावेळी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष राजेखान शेख यांच्यासह अब्बासभाई नदाफ, आयुब सनदी,सादिक मुल्ला, युनूस हासुरे, के.बी.मुल्ला, जैन समाजाचे नेते दादासो सांगावे, स्वप्नील सांगावे, उल्हास गवराई, कल्लाप्पा कुमटोळे, वसंत कुरुंदवाडे, सुधीर सांगावे, पोपट अक्कोले, भूपाल गिरमल, अशोक चौगुले आदिंसह मुस्लिम बांधव व जैन बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news