Amol Alvekar: कोल्हापूरच्या एसटी कंडक्टरने सर केले हिमालयातील हनुमान तिब्बा शिखर | पुढारी

Amol Alvekar: कोल्हापूरच्या एसटी कंडक्टरने सर केले हिमालयातील हनुमान तिब्बा शिखर

कोल्हापूर: पुढारी वृत्तसेवा : कोल्हापुरातील एसटी कंडक्टर अमोल आळवेकर (Amol Alvekar) व त्यांच्या तीन साथीदारांनी हिमालयातील हनुमान तिब्बा शिखर यशस्वीरित्या सर केले. हिमाचल प्रदेशातील धौलाधार आणि पीर पंजाल रांगेच्या मध्यवस्तीत असलेले सर्वात उंच आणि अवघड समजले जाणारे माउंट हनुमान तिब्बा (५९८२ मीटर) शिखर त्यांनी ५ जुलैरोजी सकाळी ९ वाजता सर केले.

मोहिमेतील पाच सदस्यांपैकी चार सदस्यांनी अनुक्रमे मोहीम नेता मंगेश बाळू कोयंडे (डोंबिवली) मोहीम उपनेता अमोल अशोक आळवेकर (कोल्हापूर) इक्विपमेंट इन्चार्ज अरविंद नेवले (रत्नागिरी) डेप्युटी इक्विपमेंट इन्चार्ज मोहन हुले (रायगड) यांनी यशस्वीरित्या मोहीम पार (Amol Alvekar) पाडली.

माउंट हनुमंत हे अत्यंत अवघड शिखर सर करणारे कोल्हापूर जिल्ह्यातील गिर्यारोहक अमोल अशोक आळवेकर हे पहिले व्यक्ती ठरले. तर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील पहिले कर्मचारी ठरले. त्यांनी हिमालयातील बेसिक ॲडव्हान्स एम. ओ. आय. (गिर्यारोहण प्रशिक्षक) हे गिर्यारोहणातील कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत बी. कॉम झालेले आळवेकर अॅथलेटिक्समध्ये एफएसटीओ (स्टेट रेफ्री) म्हणून काम करत आहेत.

गेली वीस वर्षे एसटी महामंडळाची नोकरी सांभाळून गिर्यारोहण क्षेत्रात रेस्क्यू आणि प्रशिक्षणाचे कार्य करीत आहेत. त्यांनी हिमालयातील या अगोदर १७,३५३ फूट उंचीचे फ्रेंडशिप शिखर सर केले आहे. क्षितिदार येथे १५, ७०० फुटांवर हाईट गेनिंग व देव ते बा शिखरावर १७, ६०० फुटांपर्यंत चढाई केली आहे. सह्याद्री रांगामध्ये असणाऱ्या आतापर्यंत ३५ सुळक्यांवर यशस्वीरित्या चढाई केली आहे. गड संवर्धन तसेच स्वच्छता मोहिमेमध्ये ते धडाडीने सहभाग घेत असतात.

या मोहीमेसाठी त्यांना गिरीमित्र प्रतिष्ठान आणि प्रकुल मांगोरे – पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

हेही वाचा 

Back to top button