चंदगड; पुढारी वृत्तसेवा : पारगड (ता. चंदगड) परिसरातील रामघाट डोहात बुडून चंदगडच्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ऋषिकेश संजय प्रभावळकर असे युवकाचे नाव आहे.
ऋषिकेश हा आपल्या मित्रा समवेत पारगड नजीक असलेल्या रामघाट दुर्गम मंदिराजवळील डोहात पोहण्यासाठी गेला होता. ऋषिकेशला पोहता येत नव्हते. यावेळी त्याचा तोल गेल्याने तो पाण्यात पडला. यानंतर तात्काळ त्याच्या मित्रांनी त्याला पाण्याबाहेर काढले. मात्र दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती डॉ. सचिन गायकवाड यांनी चंदगड पोलिसांत दिली. मयत ऋषिकेश प्रभावळकर याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे.