

किणी; पुढारी वृत्तसेवा : आषाढी एकादशी व बकरी ईद हे दोन्ही सण एकाच दिवशी म्हणजे गुरुवारी (ता.२९) आले आहेत. त्यामुळे हातकणंगले तालुक्यातील घुणकी येथील मुस्लिम बांधवांनी सामाजिक सलोखा राखत ईदची कुरबानी शुक्रवारी (ता.३०) करण्याचा निर्णय घेतला आहे.
आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आल्याने मुस्लिम समाजातील बांधवानी बैठक घेतली. सामाजिक सलोखा म्हणून बकरी ईद शुक्रवारी साजरी करण्याचा एकमुखी निर्णय घेणेत आला.यावेळी मन्सूर बाणदार, हिम्मत नदाफ, शब्बीर पठाण, आस्लम पठाण, निहाल नदाफ, रशिद सनदी, नजीर पठाण, जमीर पठाण, अमीर सनदी, बादशाह सनदी, ईलाइ बारगीर यांचेसह मुस्लिम बांधव उपस्थित होते