कोल्हापूर
Kolhapur Rain : बळीराजा सुखावला! राधानगरी परिसरात पावसाची दमदार हजेरी
राधानगरी; पुढारी वृत्तसेवा : राधानगरी परिसरात पावसाने दमदार सुरुवात केल्यामुळे गेले महिनाभर आभाळाकडे डोळे लाऊन बसलेला बळीराजा आज (दि. २४) सुखावला आहे. पाण्या अभावी ऊस व भात पीक करपून जातात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. शनिवारी (दि. २४) सकाळपासून पावसाने जोरदार एन्ट्री केली.
राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार सुरुवात केली आहे. धरणातील पाणीसाठ्यात घट झाल्यामुळे उपसाबंदी केली होती.त्यामुळे पिकांना धोका निर्माण झाला होता. शनिवारी राधानगरी धारण क्षेत्रात 60 मिमी पावसाची नोंद झाली आहे. काळम्मावाडी धरण क्षेत्रात 51 मिमी तर तुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 8 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

