कोल्हापूर : खिद्रापूर सरपंच पती कदम यांच्यावर कारवाई करावी; उपसरपंच खानोरे यांची मागणी | पुढारी

कोल्हापूर : खिद्रापूर सरपंच पती कदम यांच्यावर कारवाई करावी; उपसरपंच खानोरे यांची मागणी

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : खिद्रापूर (ता.शिरोळ) ग्रामपंचायतीचे सरपंच पती कुलदीप कदम यांच्यावर कारवाई करण्याबाबतची मागणी उपसरपंच पूजा पाटील-खानोरे यांनी केली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कर्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांना ग्रामपंचायत सदस्यांसह खानोरे यांनी याबाबतचे निवेदन दिले आहे.

खिद्रापूर (ता.शिरोळ) ग्रामपंचायतीचे सरपंच पती कुलदीप कदम यांनी मनमानी कारभार करून सभागृहातील पत्र फाडल्याचे प्रकरण घडले होते. यासाठी विशेष सभेचे आदेश असुनही सरपंच सारिका कदम यांनी विशेष सभा घेतली नाही. ग्रामपंचायत इमारतीत बेकायदेशीर बांधकाम व दरवाजे दुरुस्तीसाठी विज-चोरी प्रकरणी विज वितरण कंपनीशी पत्रव्यवहार करण्यासाठी मज्जाव करत आपल्या पतीच्या चुकीवर पडदा टाकण्याचे काम सरपंच कदम करत आहेत. यामुळे गावचा विकास खुंटत आहे. आपल्या कार्यालयातून लवकरात लवकर याबाबत कारवाई करावी अशी मागणी उपसरपंच पूजा पाटील-खानोरेसह ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांच्याकडे  निवेदनाद्वारे केली आहे.

दरम्यान दोन दिवसात कारवाई न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, सरपंच पती कुलदीप कदम यांनी मासिक सभेत बेकायदेशीर प्रवेश करून पत्र फाडाफाडी केलेप्रकरणी विशेष सभा बोलवून इतिवृत्तावर नोंद घेऊन कारवाई करावी तसेच ग्रामपंचायत मालकीच्या इमारतीत वीज चोरी करून बेकायदेशीर कामकाज केलेप्रकरणी ग्रामपंचायत व सदस्यांच्या वर कोणतीही दंडात्मक कारवाई होऊ नये यासाठी ग्रामपंचायत तिचा कोणताच संबंध नसलेबाबत वीज वितरण कंपनीशी पत्रव्यवहार करावा असा आदेश गटविकास अधिकारी शंकर कवीतके यांनी दिले आहेत.सभेचे पीठासन अधिकारी म्हणून सरपंच सारिका कदम यांनी कारवाई करणे गरजेचे होते. मात्र आपल्या पतीच्या चुकीवर पडदा टाकण्यासाठी गटविकास अधिकारी कवितके यांचा आदेश डावलून विशेष सभा घेणार नाही असे सांगितले तर वीज वितरण कंपनीशी पत्रव्यवहार करण्यास मज्जाव केला आहे.

Back to top button