Kolhapur News : खिद्रापूर ग्रामपंचायतीचे पत्र फाडल्याच्या प्रकरणानंतर आणखी एक विषय चर्चेत | पुढारी

Kolhapur News : खिद्रापूर ग्रामपंचायतीचे पत्र फाडल्याच्या प्रकरणानंतर आणखी एक विषय चर्चेत

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : खिद्रापूर ग्रामपंचायतीच्या (Khidrapur Gram Panchayat) मासिक सभेतील पत्र फाडल्याच्या प्रकरणाचा विषय मासिक सभेत घेण्यात येणार आहे. या प्रकरणानंतर ग्रामपंचायतीच्या मालकीच्या इमारतीत बेकायदेशीर दुरुस्तीसाठी विज चोरी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या दुरुस्ती करण्यात आलेल्या प्रकरणाशी ग्रामपंचायतीचा कोणताच संबंध येत नाही. त्यामुळे याप्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी असे आदेश गटविकास अधिकारी शंकर कवीतके यांनी दिले आहेत.

दरम्यान पत्र फाडाफाडी प्रकरणी गटविकास अधिकारी शंकर कवितके यांनी विशेष सभा घेण्याचे आदेश दिले होते. याबाबत ग्रामसेवक मुल्ला यांनी सरपंच कदम यांच्याशी लेखी स्वरूपात चर्चा केली असता मासिक सभेतच याविषयावर चर्चा केली जाईल असे मुल्ला यांनी सांगितले. सरपंच कदम यांनी गट विकास अधिकारी शंकर कवीतके यांच्या विशेष सभेचा आदेश टाळल्याने या प्रकरणाला एक वेगळा रंग आला आहे.

खिद्रापूर ग्रामपंचायतीच्या इमारत दुरुस्तीसाठी बेकायदेशीर विज

यावेळी माहिती देताना ग्रामसेवक मुल्ला पुढे म्हणाले, ग्रामपंचायतीच्या मालकीची राजापूर रस्त्यावरील इमारत पोस्ट कार्यालयाला भाडेत्तावर देण्याबाबत ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार केला होता. याबाबत पोस्ट कार्यालयाकडून कोणतेच उत्तर आले नाही. इमारतीच्या दुरुस्तीबाबत ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत कोणताच ठराव झालेला नाही, निविदा काढण्यात आलेली नाही. मात्र या इमारतीत बेकायदेशीर दुरुस्तीचे काम सुरू केले. लोखंडी खिडकी आणि दरवाजाच्या वेल्डिंगसाठी इमारत लगतच असणाऱ्या ट्रान्सफर्मर मधून बेकायदेशीर विज जोडणी करण्यात आली होती. या विज चोरीप्रकरणाशी ग्रामपंचायतीचा कोणताच तथा-कथित संबंध येत नाही. यानंतर संबंधित प्रकरणाचा अहवाल प्राप्त करण्यासाठी कंपनीशी पत्रव्यवहार करण्यात येईल. त्यानंतर या बेकायदेशीर काम करणाऱ्यावर कारवाई करणार असल्याचे ग्रामसेवक मुल्ला यांनी सांगितले.

 

Back to top button