Mandalik Sugar Factory : मंडलिक साखर कारखाना निवडणूक बिनविरोध | पुढारी

Mandalik Sugar Factory : मंडलिक साखर कारखाना निवडणूक बिनविरोध

कागल; पुढारी वृत्तसेवा : लोकनेते सदाशिव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल्याची माहिती समोर आले आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या कालावधीमध्ये बहुतेक उमेदवारांनी माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट होत आहे. (Mandalik Sugar Factory)

या निवडणुकीमध्ये 9 संचालकांना पुन्हा संधी देण्यात आली आहे तर आठ विद्यमान संचालकांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे 9 नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे तर महिला गटातील दोन व इतर मागासवर्गीय एक बिनविरोध होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या निवडणुकीसाठी एकूण 47 लोकांनी उमेदवारी अर्ज विविध गटासाठी दाखल केले होते यापैकी 19 उमेदवारांनी सोमवार अखेर माघार घेतली त्यामुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

गटनिहाय माघार घेतलेली उमेदवार आणि बिनविरोध झालेले उमेदवार खालील प्रमाणे उत्पादक मुरगुड गट मध्ये पाच पैकी दोन उमेदवारांनी माघार घेतल्याने कारखान्याचे विद्यमान चेअरमन खासदार संजय मंडलिक संभाजी नारायण मोरे तुकाराम गणपती ढोले हे बिनविरोध निवडून आले आहे उत्पादक गट बोरवडे मध्ये सात पैकी चार उमेदवारांनी माघार घेतली त्यामुळे आनंदा ईश्वरा फराकटे कृष्णा दत्तात्रय शिंदे सत्यजित बाळासाहेब पाटील हे बिनविरोध निवडून आले.

उत्पादक गट मौजे सांगावमध्ये गटामध्ये सहापैकी तीन उमेदवारांनी माघार घेतली कैलास माधवराव जाधव प्रकाश बाळगोंडा पाटील मंगल रामगोंडा तूकान हे निवडून आले.

उत्पादक कापशी सेनापती गटामध्ये सात पैकी चार उमेदवारांनी माघार घेतल्याने पुंडलिक दत्तात्रय पाटील विश्वास तुकाराम कुराडे प्रदीप कृष्णराव चव्हाण हे निवडून आले

बिगर उत्पादक संस्था गटामध्ये दोन पैकी एक उमेदवारांनी माघार घेतल्याने वीरेंद्र संजय मंडलिक हे बिनविरोध निवडून आले

अनुसूचित जाती व जमाती या गटामध्ये दोन पैकी एक उमेदवारी माघार घेतल्याने चित्रगुप्त दिनकर प्रभाकर हे निवडून आले

भटक्या जाती व जमातीमध्ये दोन पैकी एक उमेदवारांनी माघार घेतल्याने विष्णू गणपती बुवा हे विजयी झाले

महिला व इतर मागासवर्गीय गटातील उमेदवारांनी अद्याप माघार घेतली नसली तरी उद्या मंगळवार दिनांक सहा जून रोजी हे दोन्ही गट बिनविरोध होतील असे खात्रीलीयत सांगण्यात येत आहे

या निवडणुकीत पूर्वीच्या नऊ संचालकांना पुन्हा संधी मिळाली तर आठ विद्यमान संचालक आणि या निवडणुकीतून माघार घेतली तसेच 9 नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे तर महिला गटातील दोन व इतर मागासवर्गीय एक बिनविरोध होण्याच्या प्रतीक्षेत आहेत

निष्ठेला अशीही प्रतिष्ठा

कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत कृष्णा दत्तात्रय शिंदे गुरुजी वय 91 यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता स्वर्गीय खासदार सदाशिव मंडलिक यांच्या राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीपासून श्री शिंदे हे निष्ठावंत आहेत त्यांनी आजवर कोणत्याही पदाची अपेक्षा गटाकडून केलेली नव्हती यावेळी मात्र शिंदे गुरुजी यांनी मी मंडलिकाचा निष्ठावंत आहे 91 वर्षी मला सेवेची संधी द्यावी असे गाऱ्हाने खासदार संजय मंडलिक व सुकाणू समिती पुढे मांडले खासदार संजय मंडलिक यांनी श्री गुरुजी यांना साखर कारखान्याच्या निवडणुकीत बिनविरोध निवड करून निष्ठेला प्रतिष्ठा दिली 91 वर्षी मिळालेले या संधीचे सर्वत्र कौतुक होत आहे

Back to top button