छत्रपती संभाजी महाराज
छत्रपती संभाजी महाराज

मुरगूडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य मूर्तीची उत्साही वातावरणात प्रतिष्ठापना!

मुरगूड : पुढारी वृत्तसेवा छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीच्यावतीने येथील चौकात छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्यदिव्य अशा २२ फुटी मूर्तीची प्रतिष्ठापना उत्साही वातावरणात करण्यात आली.

आंतरराष्ट्रीय प्रवचनकार डॉ़ श्रीकृष्ण देशमुख यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या २२ फुटी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी विरेंद्र मंडलिक, उद्योगपती बाबा जांभळे, साहिल ढमाले ' देवदत्त गंगावनवाले', अॅड सुधीर सावर्डेकर हे प्रमुख उपस्थित होते.
छत्रपती संभाजी महाराज मुर्तीच्या प्रतिष्ठापने प्रसंगी संभाजी महाराजांच्या जयजयकाराच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी विद्युत रोषणाई व पुष्पवृष्टीसह फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

या प्रसंगी बोलताना डॉ. श्रीकृष्ण देशमुख म्हणाले, धर्मवीर संभाजी महाराजांची प्रेरणा नव्या पिढीला मिळून त्यांच्याकडून सत्कार्य घडेल विधायक दृष्टीकोनातून ते समाजाला पुढे नेतील.

अॅड विरेंद्र मंडलिक म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांना परिचित आहे. तसा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जनतेसमोर आणण्याची गरज आहे. त्यांच्या विषयी व्याख्यानांचे आयोजन महत्वाचे आहे.

प्रदीप वर्णे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष पांडुरंग भाट, माजी नगरसेवक, ' मारुती कांबळे आनंदा मांगले, सर्जेराव पाटील' मयूर आंगज, नवनाथ सातवेकर, डॉ. भीष्म सुर्यवंशी;, बजरंग सोनुले आदि उपस्थित होते. अनिल पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर रोहीत कोळेकर यांनी आभार मानले.

logo
Pudhari News
pudhari.news