

चंदगड; पुढारी वृत्तसेवा : चंदगड येथील पाटबंधारेचा मोजणीदार पाच हजारांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या जाळ्यात अलगद सापडला. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली.
पाणी उपसा परवाना मिळविण्यासाठी चंदगड लघु पाटबंधारे विभागातील मोजणीदारास ३ हजारांची लाच घेताना सोमवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
ताम्रपर्णी नदीतून शेतीसाठी रितसर पाणी उपसा परवाना मिळविण्यासाठी चंदगड लघु पाटबंधारे विभागाचे मोजणीदार सागर गुणवंत गोळे (वय ३६) याने ८ हजार ५०० रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती ५००० हजार देण्याचे ठरले. तक्रारपूर्वी ३००० दिल्यानंतर सोमवारी (दि. १७) त्यातील उर्वरित रक्कम देताना लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने चंदगड लघु पाटबंधारे विभागातील मोजणीदार गोळे यास ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिस निरीक्षक नितीन कुंभार, पोलिस सहाय्यक निरीक्षक संजीव बंबरगेकर, साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश भंडारे, पोना सुधीर पाटील, सचिन पाटील, मयूर देसाई, विष्णू गुरव यांच्या पथकाने ही कारवाई केली.