Hupari Cannabis Seizure | हुपरीतील तरुणाकडून ५ किलो गांजा जप्त

Hupari Cannabis Seizure |
Hupari Cannabis Seizure | हुपरीतील तरुणाकडून ५ किलो गांजा जप्त
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : पुण्यासह पिंपरी - चिंचवड परिसरातून कोल्हापूर जिल्ह्यात गांजा तस्करी करणाऱ्या हुपरी येथील संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने शुक्रवारी जेरबंद केले. धीरज राजेंद्र पोतदार (वय ३५, रा. वाळवेकरनगर, हुपरी, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून दोन लाख ५२ हजार रुपये किमतीचा पाच किलो गांजा, मोबाईल, दुचाकी असा ३ लाख ३२ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

संशयित पोतदार गांजा विक्रीसाठी हुपरी हद्दीतील चव्हाणतळी- वाळवेकरनगरकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्यावर येणार असल्याचा सुगावा लागला. पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहायक निरीक्षक सागर वाघ यांच्यासह पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. झडतीत त्याच्याकडे पाच किलो गांजा आढळून आला.

हसूर दुमालात तिघांवर वस्ताऱ्याने हल्ला

म्हालसवडे : हसूर दुमाला (ता. करवीर) येथे मित्राला झालेल्या मारहाणीचा जाब विचारण्यास गेलेल्या तरुणांसह तिघांवर वस्ताऱ्याने वार केल्याची घटना घडली. सनी दबडे, कपिल दबडे, ओंकार पाटील, अशी जखमी तरुणांची नावे आहेत. श्रीकांत ऊर्फ धाडस अशोक फडतारे (वय २८) व आकाश ऊर्फ अक्षय फडतारे (वय २६, रा. फडतारे गल्ली, हसूर) या भावांना पोलिसांनी अटक केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.