Miraj-Kolhapur railway : मंगळवारी मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गावरील डेमू गाड्या रद्द | पुढारी

Miraj-Kolhapur railway : मंगळवारी मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गावरील डेमू गाड्या रद्द

मिरज; पुढारी वृत्तसेवा : मिरज-कोल्हापूर रेल्वेमार्गावरील हातकणंगले रेल्वे स्थानकावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग बदलण्याच्या कामासह अन्य कामे करण्यात येणार आहेत. या कारणास्तव मंगळवारी (दि. 14) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावर धावणार्‍या डेमू रद्द करण्यात आल्या आहेत.

मिरज-कोल्हापूर रेल्वेमार्गावर विद्युत रेल्वे सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे हातकणंगले रेल्वे स्थानकावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचे काम करण्यात येणार असल्याने मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मंगळवारी धावणारी मिरज-कोल्हापूर, कोल्हापूर-सातारा, मिरज-कोल्हापूर-मिरज, सांगली-मिरज, कोल्हापूर-सांगली आणि कोल्हापूर-सांगली डेमू रद्द करण्यात आली आहे.  मंगळवारी धावणारी पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस मिरजेपर्यंतच धावणार आहे. तर ही गाडी बुधवारी मिरजेतूनच पुण्यासाठी रवाना होणार आहे. अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

Back to top button