कोल्हापुरात 'जुन्या पेन्शन योजने'साठी सरकारी कर्मचाऱ्यांचा मोर्चा | पुढारी

कोल्हापुरात 'जुन्या पेन्शन योजने'साठी सरकारी कर्मचाऱ्यांचा मोर्चा

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज (दि. ४) सरकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारो कर्मचारी आपल्या कुटुंबियांसमवेत सहभागी झाले होते. यावेळी सरकारविरोधात कर्मचाऱ्यांनी हातात फलक घेऊन घोषणाबाजी केली. कोल्हापुरातील गांधी मैदानातून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला.

महाराष्ट्रातील सरकारी- निमसरकारी, शिक्षक संघटनांकडून आक्रमक पवित्रा घेतला. ‘पाच राज्यांना शक्य आहे, मग महाराष्ट्राला का नाही?’ असा सवाल करीत ‘आर या पार’ची लढाई कर्मचार्‍यांनी सुरू केली आहे. कर्मचार्‍यांना सेवानिवृत्तीनंतर स्वत:च्या व कुटुंबाच्या सुरक्षिततेची हमी हवी आहे. त्यामुळेच पेन्शन हा जिव्हाळ्याचा प्रश्न बनला आहे. राज्य सरकारने 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत आलेल्या कर्मचार्‍यांची जुनी पेन्शन योजना बंद करून अन्यायकारक अंशदान पेन्शन योजना (एनपीएस) लागू केली. या योजनेतून कर्मचार्‍यांना म्हणावा तसा फायदा होत नाही. ही पेन्शन योजना कुचकाची ठरत असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून जुनी पेन्शनसाठी राज्यभर आंदोलने सुरू आहेत. मात्र, अद्याप लढ्याला यश आलेले नाही.

हेही वाचा 

Back to top button