कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : तृतीयपंथीय हा समाजातील उपेक्षित घटक असल्याने या व्यक्तींचे कोव्हिड प्रतिबंधक लसीकरण अग्रक्रमाने करणे आवश्यक होते. या उद्देशाने तृतीयपंथीयांसाठी विशेष कोव्हिड प्रतिबंधक लसीकरण अभियान दै.'पुढारी' प्रयोग सोशल फाऊंडेशन, कोल्हापूर महानगरपालिका आणि रॉबिनहूड आर्मी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले.
कोल्हापूरातील राजारामपुरी शाळा क्रमांक ९ शेजारील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्रमांक तीन येथे लसीकरण अभियान झाले आहे.
उपक्रमासाठी प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रातील मेडिकल ऑफिसर डॉ. शोभा दाबाडे, स्वप्निल पंडित, विजय कोळी, गोविंद धुळेवाड, महम्मद हनीफ खानापुरे, परिचारिका सविता जाधव, शोभा पाटील, तेजश्री घट्टे यांनी परिश्रम घेतले. यावेळी रॉबिनहूड आर्मीचे प्रसाद सोनुले, अमित जैन, ऋषीकेश बिल्ले, वैष्णवी स्वामी आदी उपस्थित होते.
तृतीयपंथीयांमध्ये लसीकरणाविषयीचे अनेक समज-गैरसमज होते. समुपदेशनाच्या माध्यमातून ते गैरसमज दूर करण्यात आले. यासाठी दै. 'पुढारी'ने राबविलेल्या उपक्रमाबद्दल शतश: आभार!
मयुरी आळवेकर, अध्यक्ष, मैत्री तृतीयपंथी संघटना
समाजातील 18 वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला लस देण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. याअंतर्गत समाजातील वंचित असणार्या तृतीयपंथीयांचे लसीकरण अभियानाच्या आयोजनाबद्दल दै. 'पुढारी'चे विशेष आभार!
रविकांत आडसूळ, उपायुक्त, कोल्हापूर महानगर पालिका