Kolhapur Voter List | कोल्हापुरातील ४.४९ लाख नावे मतदार यादीतून वगळली

२९ लाख ६ हजार ३१ मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध; ४ नोव्हेंबरला अंतिम होणार
Kolhapur Voter List |
Kolhapur Voter List | कोल्हापुरातील ४.४९ लाख नावे मतदार यादीतून वगळली
Published on
Updated on

कोल्हापूर : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (एसआयआर) मतदार पडताळणीत मयत, दुबार, कायमचे स्थलांतरित, गैरहजर आणि गणना अर्जांवर सही करण्यास नकार दिलेल्या तब्बल ४ लाख ४९ हजार २१३ मतदारांची नावे रद्द करण्यात आली आहेत. यामध्ये महिला मतदारांची संख्या अधिक आहे.

मतदार पडताळणीनंतर जिल्ह्याची २९ लाख ६ हजार ३१ मतदारांची प्रारूप मतदार यादी सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी त्याबाबतची माहिती दिली. प्रारूप यादीवर मंगळवार (दि. १) पासून हरकत, दावे दाखल करता येतील. सोबतच नव्याने नोंदणीसाठी मतदारांना अर्जही करता येईल. प्रारूप मतदार यादीतील १,१७,४४६ विसंगती आढळलेले तर १,१५,९४६ मॅपिंग नसलेले अशा एकूण २,३३,९९२ मतदारांची सुनावणी घेतली जाईल. योग्य पुरावे सादर केल्यावरच त्यांची नावे ४ नोव्‍हेंबरला प्रसिद्ध होणार्‍या अंतिम मतदार यादीत समावेश केली जातील.

४०.९५ टक्के तरुण मतदार

प्रारूप मतदार यादीत ४०.९५ टक्के तरुण मतदार आहेत. १८ ते ४० वयोगटातील या मतदारांची संख्या ११ लाख ९० हजार २०४ इतकी आहे.

रद्द झालेले मतदार

पुरुष :...... २ लाख १० हजार ७१५

महिला :.....२ लाख ३८ हजार ४७२

तृतीयपंथी :........................२६

कोल्हापुरातील वगळलेले मतदार

दिलेल्‍या पत्त्‍यावर न आढळलेले ९७,५४७

यादीत दुबार नावे असलेले मतदार ४८,९८१

कायमस्वरूपी स्थलांतरित १,५८,३२८

मरण पावलेल्या मतदारांची संख्या १,४२,७४८

राज्यातील वगळलेले मतदार

दिलेल्‍या पत्त्‍यावर न आढळलेले

७५,५२,०००

७.७२%

कायमस्वरूपी स्थलांतरित

७६,८०,०००

७.८५%

मरण पावलेल्या मतदारांची संख्या

३४,८१,०००

३.५६%

यादीत दुबार नावे असलेले मतदार

१७,६३,०००

१.८०%

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news