Shelke Complex | कोल्हापूर : बांबवडेत ‘शेळके’ कॉम्प्लेक्स उभारणाऱ्या बिल्डरांमध्ये वादाची ठिणगी; गुंतवणूकदारांमध्ये खळबळ

Shelke Complex | कोल्हापूर : बांबवडेत ‘शेळके’ कॉम्प्लेक्स उभारणाऱ्या बिल्डरांमध्ये वादाची ठिणगी; गुंतवणूकदारांमध्ये खळबळ

Published on

बांबवडे : पुढारी वृत्तसेवा : बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे अंबिरा ओढ्यालगत महत्वाकांक्षी व्यावसायिक शेळके कॉम्प्लेक्स (Shelke Complex) उभारणाऱ्या विकसक (बिल्डर) भागीदारांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. हा वाद आता शाहूवाडी पोलिसांच्या टेबलवर पोहोचला आहे. प्रकल्पाला अनुसरून त्रिवेणी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लि. कंपनीच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता झाल्याचा दावा करीत मुंबईस्थित मुख्य भागीदार प्रवीण घाडगे यांनी सहभागीदार अमित जाधव यांच्याविरोधात ५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार शाहूवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे.

याप्रकरणी संशयित अमित अशोक जाधव तसेच या फसवणुकीच्या गुन्ह्यात संशयिताला सहकार्य केल्याबद्दल बँक एजंट हरीश साळुंखे, राम गायधर, सुपरवायझर रवींद्र खाडे (सर्व रा. कोल्हापूर) या चौघाजणांविरुद्ध शाहूवाडी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला (Shelke Complex) आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रवीण घाडगे, अमित जाधव, उमेश आप्पासाहेब भारते, नितीन दत्तात्रय कुंभार या चार मित्रांनी मिळून २०१४ साली त्रिवेणी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून बांबवडे अंबिरा ओढ्यानजीक अंजनाबाई शेळके यांच्या मालकीच्या १ हेक्टर ३४ गुंठे जागेत व्यावसायिक प्रकल्पाचे विकसन करारपत्र केले. यानुसार या प्रकल्पात विकसक म्हणून घाडगे यांची ७० टक्के तर उर्वरित तिघांची प्रत्येकी १० टक्के भागीदारी ठरली होती.

दरम्यान, हा प्रकल्प प्रगतीच्या वाटेवर असताना फिर्यादी घाडगे हे मुंबईत वास्तव्यास होते. तर अमित जाधव हे प्रत्यक्ष प्रकल्पाचे जागेवर कामकाज पाहत होते. यासाठी घाडगे यांनाही जाधव यांच्यावर विश्वास ठेवला होता. दरम्यान अमित जाधव हे उमेश भारते, नितीन कुंभार या सहभागीदारांना प्रकल्पाच्या कामात सहभागी करून घेत नसल्याचे निदर्शनास आल्यावर घाडगे यांनी जाधव यांना समज दिली होती.

Shelke Complex : १५ कोटींचा खोटा खर्च दाखवून प्रकल्प तोट्यात असल्याचा हिशोब

पुढे जाऊन अमित जाधव यांनी कंपनीची बोगस मिटिंग दाखवून ठरावाद्वारे घाडगे यांच्या परस्पर खोटी सही करून स्वतःच्या नावे अधिकार पत्र (ॲथोरिटी) करून घेतले. त्याद्वारे पुरवणी विकसन करार पत्र, या प्रकल्पातील रहिवासी, व्यावसायिक गाळे विक्री केले. यातून उपलब्ध रकमेतून प्रकल्पाला ५ कोटी रुपयांचा फायदा झाल्याचे प्रत्यक्ष दिसत असताना अमित जाधव याने १५ कोटी रुपयांचा अतिरिक्त किंबहुना खोटा खर्च दाखवून प्रकल्प तोट्यात असल्याचा वरवरचा हिशोब दाखवला आहे.

त्याने स्वतःच्या आर्थिक फायद्याच्या हव्यासातून आणि पूर्वनियोजित कट रचून कंपनीची ५ कोटी रुपये फसवणूक केली आहे. यासाठी जाधव याला हरीश साळुंखे, राम गायधर (दोघेही बँक एजंट), सुपरवायझर रवींद्र खाडे या तिघांनी फसवणुकीच्या कामात मदत केल्याचे मुख्य भागीदार प्रवीण घाडगे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news