कोल्‍हापूर : मुलाच्या हव्यासापोटी पत्‍नीचा खून, दोनवडे येथील घटना | पुढारी

कोल्‍हापूर : मुलाच्या हव्यासापोटी पत्‍नीचा खून, दोनवडे येथील घटना

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा- कौटुंबिक वादातून पतीने केलेल्या हल्ल्यात अश्विनी एकनाथ पाटील (वय 28, राहणार दोनवडे तालुका करवीर ) यांचा आज (शनिवार) सकाळी मृत्यू झाला. दाम्प‍त्याला दोन मुली आहेत. मुलगा व्‍हावा यासाठी पतीचा आग्रह होता त्यातून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. पतीकडून अश्विनीचा शारीरिक मानसिक जाचहाट केला जात होता. असेही करवीरचे पोलीस उपनिरीक्षक निवास पवार यांनी सांगितले.

या प्रकरणी पती एकनाथ पाटील (वय 35) याला करवीर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शनिवारी पहाटे दोनवडे येथे घटना घडली. पत्नीचा शॉक लागून मृत्यू झाला असा पतीने बनाव केला होता, मात्र करवीर पोलिसांच्या चौकशीत हा प्रकार उघडकीला आल्याचे सांगण्यात आले. दांपत्याला दोन मुली आहेत. मुलांसाठी पतीचा आग्रह होता. त्यातून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. पतीकडून अश्विनीचा शारीरिक मानसिक जाचहाट केला जात होता. असेही करवीरचे पोलीस उपनिरीक्षक निवास पवार यांनी सांगितले. संशयित पतीला ताब्यात घेण्यात आले आहे.

हेही वाचा : 

Back to top button