44 lakh fraud Case | दामदुपटीच्या आमिषाने 44 लाखांची फसवणूक

44 lakh fraud Case |
44 lakh fraud Case | दामदुपटीच्या आमिषाने 44 लाखांची फसवणूक(Pudhari File Photo)
Published on
Updated on

कोल्हापूर : सहा महिन्यांत दामदुप्पट परतावा देण्याच्या आमिषाने 44 लाख 25 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात मोहसीन बाबासाहेब नदाफ (वय 36), त्याचा चुलत भाऊ सोहेल हैदरखान नदाफ (रा. मुरगूड, ता. कागल) गुन्हा दाखल झाला आहे. अजिंक्य अनिल पाटील (रा. सम—ाटनगर, कोल्हापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी संशयित सोहेल नदाफ याला अटक केली आहे.

फिर्यादी पाटील यांचा वैद्यकीय उपकरणे खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. उद्यमनगर येथील त्यांच्या कार्यालयाच्या नूतनीकरणावेळी संशयिताची ओळख झाली. नूतनीकरणासाठी लागणारे साहित्य मोहसीन नदाफ याच्याकडून खरेदी करण्याचा सल्ला त्याने दिला. या ओळखीतून संशयितांनी डिसेंबर 2022 मध्ये पाटील यांची कार्यालयात जाऊन भेट घेतली. बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्यास सहा महिन्यांत दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार पाटील यांनी पाच महिन्यांत टप्प्याटप्प्याने 80 लाख रुपये दिले. त्यानंतर परतावा मिळत नसल्याने त्यांनी मुद्दल परत मागितली. 80 लाखांपैकी 35 लाख 75 हजार परत मिळाले.

उर्वरित 44 लाख 25 हजार अद्याप परत मिळाले नाहीत. पाटील यांनी संशयिताविरुद्ध फिर्याद दाखल करताच सोहेल नदाफ याला पोलिसांनी अटक केली. त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news