Marathi Film Corporation Election | मराठी चित्रपट महामंडळाच्या 14 जागांसाठी 44 उमेदवार रिंगणात

3 बिनविरोध; 60 पैकी 13 उमेदवारांची माघार
Marathi Film Corporation Election |
Marathi Film Corporation Election | मराठी चित्रपट महामंडळाच्या 14 जागांसाठी 44 उमेदवार रिंगणात
Published on
Updated on

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत रंगत वाढली असून 60 उमेदवारांपैकी 13 जणांनी अर्ज माघारी घेतल्याने आता 14 जागांसाठी 44 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोन प्रमुख पॅनेल आणि काही अपक्ष उमेदवारांमध्ये थेट लढत होणार असल्याने चित्रपटसृष्टीचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. शुक्रवारी (दि. 29) अंतिम उमेदवार यादी जाहीर करून निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.

अभिनेत्री गटातून वर्षा उसगावकर, गायक गटातून आनंद शिंदे व संकलन गटातून विजय खोचीकर या उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. मावळते अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी समर्थ पॅनेल स्थापन केले आहे. माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांनी चिन्हवाटपानंतर पॅनेल स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगितले.

चर्चेतल्या माघारी

अभिनेत्री गटातून नीलम शिर्के यांनी अर्ज माळी घेतल्याने चित्रपटसृष्टीत मोठी चर्चा रंगली. ज्येष्ठ अभिनेते अर्जुन नलवडे यांची माघारही अनपेक्षित होती. तर बाळकृष्ण बारामती यांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आल्यानंतर त्यांनी उमेदवारी वैध ठरावी यासाठी ठाम भूमिका मांडली होती. मात्र, शेवटच्या दिवशी त्यांनीही माघार घेतल्याने त्यांच्या निर्णयाचीही चर्चा सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news