File Photo
कोल्हापूर
कोल्हापूर : गडहिंग्लजला मद्यासह 4.41 लाखांचा मुद्देमाल जप्त
गडहिंग्लज; पुढारी वृत्तसेवा : राज्य उत्पादन शुल्क गडहिंग्लज विभागाने बुधवारी गडहिंग्लज-संकेश्वर मार्गावर औरनाळ फाटा येथे बड्याचीवाडी हद्दीत छापा टाकून विदेश बनावटीचे मद्य व वाहन असा 4 लाख 41 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
याप्रकरणी मारुती भैरू माने (वय 41, रा. गायकवाडी, ता. निपाणी, जि. बेळगाव), अमर बाळासाहेब पाटील (रा. गडहिंग्लज, मार्केट यार्डजवळ), विनायक प्रभाकर संकपाळ (रा. पडळीहाळ, ता. निपाणी, जि. बेळगाव) यांना अटक केली. यामध्ये कारमधून ही वाहतूक सुरू होती. यामध्ये मद्याचे 20 बॉक्स आढळले. याशिवाय दोन दुचाकीही जप्त केल्या.
31 डिसेंबर व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्कने विविध ठिकाणी तपासणी नाके उभारले आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये मद्याची विक्री होणार नाही, यासाठी वेगवेगळ्या पथकांमार्फत कारवाई करण्यात येत आहे.

