कोल्हापूर : राधानगरी तालुक्यात बहुसंख्य ग्रामपंचायतींवर महिलाराज | पुढारी

कोल्हापूर : राधानगरी तालुक्यात बहुसंख्य ग्रामपंचायतींवर महिलाराज

गुडाळ, पुढारी वृत्तसेवा : राधानगरी तालुक्यात निवडणूक झालेल्या ६६ ग्रामपंचायत पैकी ३३ ग्रामपंचायती मधील सरपंच पदे महिलासाठी राखीव होती. त्याशिवाय सरपंच पदाच्या तीन खुल्या जागेवर ही महिला उमेदवारांनी निवडणूक लढविली आणि विजय मिळवला. त्यामुळे ६६ पैकी ३६ ग्रामपंचायीतींवर आता महिलाराज असणार आहे.

महिला राखीव सरपंच पदाव्यतिरिक्त खुल्या असलेल्या राधानगरीच्या सरपंच पदासाठी जिल्हा परिषद सदस्या सविता राजेंद्र भाटळे यांनी निवडणूक लढविली. त्यांनी माजी सरपंच दादासाहेब सांगावकर यांचा पराभव करीत थेट सरपंचपद पटकावले. इतर मागासवर्गीयासाठी आरक्षित असलेल्या करंजफेण सरपंच पदासाठी शहाजी ढेरे, करिष्मा मांगोरे यांचा पराभव करत जयश्री सखाराम वागरे यांनी सरपंच पद पटकावले. कांबळवाडी येथील खुल्या सरपंच पदासाठी अनिता सुरेश कुसाळे यांनी बाजी मारली. आंतरराष्ट्रीय नेमबाज स्वप्निल कुसाळे यांच्या मातोश्री असलेल्या सौ अनिता कुसाळे यांनी सरपंच पदाच्या खुर्चीचा अचूक वेध घेतला.

या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक पदवीधर, उच्चशिक्षित महिला थेट सरपंच पदावर विराजमान झाल्या आहेत. त्यामुळे महिला सरपंच पदांचा शैक्षणिक दर्जाही उंचावल्याचे चित्र आहे. एकूणच राधानगरी तालुक्यात निवडणुका झालेल्या बहुतांश गावावर महिलाराज आल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button