ग्रामपंचायत निवडणूक : धामोडमध्ये उमेदवारांच्या घरासमोर काळ्या बाहुल्या, लिंबू, कापलेल्या कोंबड्या अन् बरंच काही…. | पुढारी

ग्रामपंचायत निवडणूक : धामोडमध्ये उमेदवारांच्या घरासमोर काळ्या बाहुल्या, लिंबू, कापलेल्या कोंबड्या अन् बरंच काही....

धामोड; पुढारी वृत्तसेवा : धामोड (ता. राधानगरी) येथे ग्रामपंचायत निवडणुक होत आहे. या पार्श्वभूमीवर करणी करण्याचे प्रकार घडताना दिसत आहेत. निवडणुकीत एका पॅनलचा पराभव होण्यासाठी अज्ञात लोकांनी भानामती व करणी करण्याचा प्रयत्न केल्याचे आढळून आले आहे. या प्रकारामुळे धामोडसह राधानगरी तालुक्यात खळबळ उडाली असून धामोड ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

काल (गुरुवार) रात्री धामोड पैकी नऊनंबर वसाहत येथील नदी घाटाजवळ हा भानामती व करणीचा प्रकार घडलेला आढळून आला असून नवणे गटाच्या चौदा उमेदवारांच्या प्रचाराच्या जाहिरातीच्या कागदावर लाल पेनाने लिखाण केल्याचे निदर्शनास आले आहे. या ठिकाणी चौदा काळ्या बाहुल्या, लिंबू, कापलेल्या कोंबड्या, गंडे-दोरे व करणीसाठी वापरले जाणारे सर्व साहित्य मिळून आले आहे. तसेच नवणे गटाच्या सर्व उमेदवारांच्या घरासमोर काळ्या बाहुल्या व लिंबू टाकले आहेत.

या घटनेमुळे नवणे गटातून तीव्र संताप व्यक्त होत असून धामोड ग्रामस्थांमध्ये भिती पससली आहे. या प्रकाराची धामोडचे पोलीस पाटील महादेव फडके यांनी पाहणी केली असून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

हे वाचलंत का?

kolhapur elections : करवीरच्या रणांगणात नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Kolhapur : म्हासुर्ली-चौधरवाडी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी शेतकरी आक्रमक

कोल्‍हापूर : धामोड ग्रामपंचायत निवडणुकीत होणार दुरंगी लढत

Back to top button