

यड्राव : शहापूर येथे यंत्रमाग कारखानदाराकडून उधारीवर ग्रे कापड खरेदी करून त्याचे पैसे परत न देता 40 लाख 4 हजार 426 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. शर्वरी शिवराज तारदाळे (वय 42), शिवराज शंकर तारदाळे (वय 51, दोघे रा. राजराजेश्वरीनगर, इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणी सुधीर श्रीगोपाल दरगड (वय 42, रा अयोध्यानगर, इचलकरंजी) यांनी शहापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
शर्वरी व शिवराज तारदाळे यांची इचलकरंजी येथे श्री साई टेक्स्टाईल नावाची कापड खरेदी-विक्रीची फर्म आहे. शहापूर येथील खंजिरे औद्योगिक वसाहतीमध्ये दरगड ग्रुपचा स्वयंचलित यंत्रमाग कारखाना आहे. तारदाळे दाम्पत्याने दरगड ग्रुपचा विश्वास संपादन करुन सुधीर दरगड यांच्याकडून उधारीवरती ग्रे कापड खरेदी केले. मे ते सप्टेंबर 2022 दरम्यान ग्रे कापड खरेदी करून 13 बिलानुसार एकूण 40 लाख 4 हजार 426 रुपयांची जीएसटी बिले दिली. ग्रे कापड प्रोसेसिंगसाठी पुढे पाठविले. कापड विक्री केल्यानंतर मागणी करूनही मालाची रक्कम परत मिळत नसल्याचे फिर्यादीत नमूद आहे.