

क्रशर चौकातील इराणी खणीमध्ये रविवारी (दि. 19) होणार्या सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी पोलिस प्रशासनाने वाहतूक मार्गांमध्ये बदल केले आहेत. रंकाळा टॉवर ते क्रशर चौक या मार्गावर गणेशमूर्ती घेऊन येणारी मंडळे, अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून इतर वाहनांना प्रवेश बंद केला आहे.
बिनखांबी गणेश मंदिर ते महालक्ष्मी चौक ते पापाची तिकटी मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांसह गणेश मूर्ती विसर्जनास येणार्या वाहनांना मनाई करण्यात येत आहे.
रंकाळा टॉवर ते क्रशर चौक, क्रशर चौक ते देवकर पाणंद सिग्नल, देवकर पाणंद ते क्रशर चौक, आपटेनगर ते क्रशर चौक या मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना तसेच खाद्यपदार्थ विक्री करणार्यांच्या वाहनांना मनाई करण्यात येत आहे.
शालिनी पॅलेस ते क्रशर चौक या मार्गावर इतर वाहनांना प्रवेश बंद असणार आहे.
कोल्हापूर शहरात अवजड वाहनांसाठी रविवारी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रवेश बंदी आहे. या दिवशी जड-अवजड वाहनांनी पुढील मार्गांचा अवलंब करावा.
शियेमार्गे शहरात येणार्या अवजड, जड व मध्यम आकाराच्या मालवाहतूक वाहनांना हनुमान टेकडी या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येत आहे.
तावडे हॉटेलमार्गे कोल्हापूर शहरात येणार्या अवजड, जड व मध्यम आकाराच्या मालवाहतूक करणार्या वाहनांना ताराराणी पुतळा चौक या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येत आहे.
उचगावमार्गे कोल्हापूर शहरात येणार्या अवजड, जड व मध्यम आकाराच्या मालवाहतूक करणार्या वाहनांना कोयास्को चौक या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येत आहे.
शाहू टोल नाकामार्गे कोल्हापूर शहरात येणार्या अवजड, जड व मध्यम आकाराच्या माल वाहतूक करणार्या वाहनांना सायबर चौक या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येत आहे.
सायबर कॉलेज चौक, संभाजीनगर सिग्नलमार्गे कोल्हापूर शहरात येणार्या अवजड, जड व मध्यम आकाराच्या मालवाहतूक करणार्या वाहनांना एन.सी.सी. भवनसमोर, एस.एस.सी. बोर्ड, शेंडा पार्क चौक, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम या ठिकाणी शहरात येण्यास प्रवेश बंद करण्यात येत आहे.
रिंग रोड, कळंबा जेलमार्गे कोल्हापूर शहरात येणार्या अवजड, जड व मध्यम आकाराच्या माल वाहतूक करणार्या वाहनांना रेसकोर्स नाका चौक या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येत आहे.
नवीन वाशी नाकामार्गे कोल्हापूर शहरात येणार्या अवजड, जड व मध्यम आकाराच्या मालवाहतूक करणार्या वाहनांना आपटेनगर चौक या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येत आहे.
बालिंगामार्गे कोल्हापूर शहरात येणार्या अवजड, जड व मध्यम आकाराच्या मालवाहतूक करणार्या वाहनांना फुलेवाडी नाका या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येत आहे.
आंबेवाडीमार्गे कोल्हापूर शहरात येणार्या अवजड, जड व मध्यम आकाराच्या मालवाहतूक करणार्या वाहनांना वडणगे फाटा या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येत