कोल्हापूर: श्रद्धाच्या मारेकऱ्याला फाशी द्या; मुरगूडमध्ये निषेध फेरी | पुढारी

कोल्हापूर: श्रद्धाच्या मारेकऱ्याला फाशी द्या; मुरगूडमध्ये निषेध फेरी

मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा : वसईच्या श्रद्धा वालकरची अमानुष हत्या करणाऱ्या आफताब पूनावाला या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. श्रद्धाला योग्य न्याय मिळाला पाहिजे, या मागणीसाठी मुरगूड (ता. कागल) येथे निषेध फेरी काढण्यात आली. यावेळी तरूण, तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सानिका स्पोर्ट्स व इतर मंडळांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही निषेध फेरी नाका नंबर एक पासून प्रारंभ झाली. मुख्य बाजारपेठ मार्गावरून ऐतिहासिक तुकाराम चौक येथून मुरगूडच्या मध्यवर्ती बस स्थानक परिसरात सांगता करण्यात आली.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी म्हणाले की, श्रद्धा वालकर या तरुणीची आफताबने अत्यंत अमानुषपणे हत्या केली. याबद्दल त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. ओंकार पोतदार म्हणाले की, ज्या अमानुषपणे श्रद्धाची हत्या केली आहे, ते पाहता आरोपीला फाशी देणे योग्य आहे. यावेळी उज्ज्वला कांबळे, सुरेखा पाटील, वैष्णवी कळमकर, विकी साळोखे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी पांडूरंग कुडवे, निवास कदम, बिंदू चौगुले, नंदकिशोर खराडे, निशांत जाधव, सुशांत मांगोरे, सागर सापळे, पांडुरंग मगदूम, युवराज सूर्यवंशी, सर्जेराव भाट, प्रशांत कूडवे, पृथ्वीराज चव्हाण, सोन्या मोरबाळे आदीसह विद्यार्थी, विद्यार्थिनी, नागरिक उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button