कोल्हापूर : सुळकूड योजनेविरोधात दत्तवाड परिसरात कडकडीत बंद | पुढारी

कोल्हापूर : सुळकूड योजनेविरोधात दत्तवाड परिसरात कडकडीत बंद

दत्तवाड : पुढारी वृत्तसेवा : इचलकरंजी शहरासाठी मंजूर झालेल्या सुळकूड योजनेविरोधात दूधगंगा बचाव कृती समितीच्या वतीने केलेल्या आव्हानाला शिरोळ, कागल तालुक्यातून प्रतिसाद मिळत आहे. ही योजना मंजूर केलेल्याबद्दल दतवाडसह परिसरातील नवे व जुने दानवाड, टाकळीवाडी, घोसरवाड आधी गावांनी कडकडीत बंद पाळून प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला.

दूधगंगा नदीवरील सुळकूड योजना कोणत्याही परिस्थितीत कार्यान्वित होऊ द्यायची नाही, असा निर्धार दूधगंगा बचाव कृती समिती व नदीकाठावरील गावांनी बांधला आहे. याबाबत मंगळवार (दि.८) पासून शिरोळ व कागल तालुक्यातील विविध गावांनी बंद पाळण्याचा निर्धार केला आहे. याचाच एक भाग म्हणून आज दतवाडसह परिसरातील गावांनी बंद पाळला. याप्रसंगी गावागावात नागरिकांनी एकत्रित जमून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. सोमवार १४ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या भव्य मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार शेतकरी व ग्रामस्थांनी व्यक्त केला.

तालुक्यातील जनतेवर अन्याय होत असताना कागल व शिरोळ तालुक्यातील आमदार गप्प का? असा सवाल ही ग्रामस्थांतून उपस्थित होत आहे. त्यामुळे सुळकूड योजनेविरोधात दूधगंगा नदी काठावरील जनतेबरोबर त्यांनी पुढाकार घेऊन ही योजना रद्द करण्यास प्रशासनास भाग पाडावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

हेही वाचा :

Back to top button