

गारगोटी; पुढारी वृत्तसेवा : रविवारी कोनवडे नजीक ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्राॅलीचा मोटरसायकला धक्का लागून अपघात झाल्याची घटना घडली. दारवाड कुर रस्त्यावर झालेल्या या अपघातात मोटरसायकलवरील एका महिलेचा मृत्यू तर तिघेजण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नेत असताना साधना पांडुरंग चोरगे (वय- 24, रा. अंतुर्ली) या महिलेचा मृत्यू झाला. तर मुलगी आर्या (वय १ वर्षे) व भाऊ आश्रम आनंदा कामते (वय २८, रा. करंजीवणे, ता. कागल) हे दोघे जखमी झाले आहेत. भुदरगड पोलिसात या अपघाताची नोंद झाली आहे. (Kolhapur)
आश्रम कामते यांच्या मुलाच्या बारशासाठी आश्रम, साधना व तिची मुलगी आर्या बसरेवाडी येथे आले होते. मोटरसायकलवरून गावी जात असताना कोनवडे नजीकच्या जीतान ओढ्याजवळ उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीने मोटरसायकला जोराचा धक्का दिला. यामुळे मोटारसायकलवरील सर्वजण खाली पडले. याचदरम्यान साधना यांच्या उजव्या हातावर ट्रॅक्टर ट्रॉलीचे चाक गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. सर्व जखमींना उपचारासाठी नेत असताना उपचारापूर्वी साधना यांचा वाटेत मृत्यू झाला तर मुलगा आर्या व भाऊ आनंद हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Kolhapur)
ट्रॅक्टर चालक मोठ्या आवाजात उसाने भरलेली ट्रॉली वेगाने चालवत होता. ट्रॅक्टर चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याची फिर्याद रोहित आनंदा कामते यांनी पोलिसात दिली आहे. याप्रकरणी शिवाजी उत्तम डाफळे (रा. निळपण) याच्यावर भुदरगड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा