राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले | पुढारी

राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले

राधानगरी,पुढारी वृत्तसेवा: गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे आज दुपारी उघडले.

तीन नंबरचा दरवाजा २ वाजून ४२ मिनिटांनी तर व ३ वाजून २७ मिनिटांनी सहा नंबरचा उगडला असून भोगाती, पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वेगाने वाढ होत आहे.

या दोन दरवाजांतून २८५६ क्यूसेक्स व वीज गृहातून १४०० कयुसेक्स असा एकूण ४२५६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

भोगावती नदीपात्रात हा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता समीर निरूखे यांनी दिल्या आहेत.

आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात धरण क्षेत्रात ३४ मिमी पावसाची नोंद झाली असून आज अखेर ३९९८ मिमी पाऊस झाला आहे.

२५ जुलै रोजी राधानगरी धरण पूर्ण भरून चार दरवाजे उघडले होते. तत्पुर्वी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने कोल्हापूरसह शिरोळ,

हातकणंगले तालुक्यात महापूर आला होता. पंचगंगेची पाणीपातळी ५७ फुटांवर गेली होती.

त्यामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती.

Back to top button