

कोल्हापूर : प्रथमच निवडणूक रिंगणात उतरल्या, मतदारांपर्यंत पोहोचल्या आणि विजयी झाल्या अशा 34 नव्या नगरसेविकांनी महापालिकेत एंट्री केली आहे. 81 पैकी 41 राखीव गटातून 41 नगरसेविकांनी विजयाची पतका लावली आहेच; त्याचबरोबर सर्वसाधारण गटातून दोन नगरसेविकांनीही यश मिळवले आहे. त्यामुळे नव्या सभागृहात 43 नगरसेविकांचा आवाज घुमणार आहे. एकूण सदस्यांच्या तुलनेत महिला लोकप्रतिनिधींची संख्या जास्त ठरली आहे.
1 राखीव गटातून 149 तर खुल्या प्रवर्गासह नागरीकांचा मागासवर्ग, अनुसूचित जातीजमाती अशा गटांतून 6 महिलांसह एकूण 157 महिला उमेदवार होत्या. महत्वाचे म्हणजे अपक्ष खिंड लढवणार्या महिलांची संख्या 34 होती. महायुती आणि महाविकास आघाडी या पक्षांनी माजी नगरसेविकांबरोबरच काही नव्या चेहर्यांनाही संधी दिली होती. त्यामुळे महिला उमेदवारांच्या विजयाकडे सार्या शहरवासियांचे लक्ष लागले होते.
यंदा नव्या सभागृहात जाणार्या महिलांमध्ये महायुतीच्या राजनंदा महाडिक, वंदना मोहिते, शीला सोनुले, दीपा ठाणेकर, दीपा काटकर, मंगल साळोखे, संगीता सावंत, माधवी पाटील, पूर्वा राणे, नीलांबरी साळोखे, माधुरी व्हटकर, रेखा उगवे, निलीमा पाटील, सृष्टी जाधव, पूजा पोवार, कौसर बागवान शिवसेना शिंदे गट, अॅड. मानसी लोळगे , सुरेखा ओटवेकर, नेहा तेंडुलकर यांचा समावेश आहे. काँग्रेसच्या डॉ. सुषमा जरग, पुष्पा नरुटे, अर्चना बिरांजे, शुभांगी पाटील, रुपाली पोवार, प्राजक्ता जाधव, ऋग्वेदा माने, स्वालीया बागवान, दिलशाद मुल्ला, धनश्री कोरवी, अरुणा गवळी, जयश्री कांबळे, स्वाती कांबळे, दीपाली घाटगे, यांचा समावेश आहे.