जयसिंगपूर : पोलिसांना चकवून कैदी पळाला

जयसिंगपूर : पुढारी वृत्तसेवा : मोटरसायकल चोरी प्रकरणी गुन्हा अन्वेषण पथकाने पकडलेला संशयित आरोपी प्रदीप ऊर्फ पद्या कटकोळे (वय 23 हेरले ता.हातकणंगले) हा पोलिसांना चकवून पळून गेला. वैद्यकीय तपासणीकरिता त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता त्याने पोलिसांना गुंगारा दिला. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.
मोटारसायकल चोरीप्रकरणी केटकाळे याला कोल्हापुरातून ताब्यात घेतले होते. सोमवारी दुपारी त्याला प्रथम वर्ग न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. वैद्यकीय तपासणीवेळी तो पळून गेला. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नाही. त्याच्या शोधासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत.
महिला पोलिसांवर जबाबदारी
केटकाळेला न्यायालयात नेण्याची जबाबदारी महिला कॉन्स्टेबलवर देण्यात आली होती. त्यांच्याबरोबर दोन होमगार्डही होते.