कोल्‍हापूर : शिरोलीत हॉटेल बिलाच्या कारणावरुन तरुणास मारहाण; ८ जणांवर गुन्हा दाखल | पुढारी

कोल्‍हापूर : शिरोलीत हॉटेल बिलाच्या कारणावरुन तरुणास मारहाण; ८ जणांवर गुन्हा दाखल

शिरोली एमआयडीसी; पुढारी वृत्तसेवा : पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथे हॉटेल बिलाच्या कारणवरून हॉटेल मालकाच्या मुलास लाथा बुक्या व दगड, विटाने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत यश धनाजी हांडे (वय ३०, रा. पुलाची शिरोली ता. हातकणंगले) हा गंभीर जखमी झाला. या प्रकरणी रोहित बाजीराव सातपुते याच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शिरोली एमआयडीसी पोलिसांतून मिळालेली माहितीनुसार. पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथील शिरोली फाट्यावर असलेल्या हॉटेल पंचवटी येथे रविवारी रात्री रोहित बाजीराव सातपुते याच्यासह अन्य सातजण आले होते. यावेळी हॉटेल बिलासंबधी त्यांच्यामध्ये वाद झाला. यातून रोहित व अन्य तरुणांनी यश याच्यावर हल्ला करुन त्यास बेदम मारहाण केली. त्यांना अडविण्यासाठी आलेल्या धनाजी हंडे व अन्य कामगारांनाही मारहाण केली. याबाबतीत पोलिस स्‍टेशनमध्ये फिर्याद देण्याचा प्रयत्न केल्यास जातीवाचक गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. याबाबत आठ जणांवर शिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :  

Back to top button