कोल्हापूर : पुलाची शिरोलीत ट्रकच्या धडकेत वृध्द ठार | पुढारी

कोल्हापूर : पुलाची शिरोलीत ट्रकच्या धडकेत वृध्द ठार

शिरोली एमआयडीसी, पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली येथे सोमवारी (दि. १९) दुपारी घडलेल्या अपघातात एकजण ठार झाला. बापू आनंदा लोहार (वय ६० रा. गडमुडशिंगी ता, करवीर) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुलाची शिरोली येथे मदरशासमोर महामार्गावर भरधाव ट्रकने बापू लोहार या वृद्धास जोरदार धकड दिली. या धडकेत वृद्धाच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाल्याने कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान उपचार सुरु असताच या वृद्धाचा मृत्यू झाला. याबाबत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रक चालकविरोधात गुन्हा दाखल झाला असून स.पो.नि सागर पाटील पुढील तपास करीत आहेत.

 

Back to top button