Dam Repair Project | ‘अल-निनो’च्या पार्श्वभूमीवर ३४ बंधारे दुरुस्‍तीसाठी ३२.१७ कोटींचा प्रस्ताव

धरणांतील पाणीसाठा संवर्धनासाठी बंधाऱ्यांची गळती रोखणार
Dam Repair Project |
Dam Repair Project | ‘अल-निनो’च्या पार्श्वभूमीवर ३४ बंधारे दुरुस्‍तीसाठी ३२.१७ कोटींचा प्रस्तावPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

सुनील सकटे

कोल्हापूर : ‘अल-निनो’च्या प्रभावामुळे पावसाच्‍या प्रमाणात घट झाली आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्‍याने राज्‍यात दुष्‍काळ निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील उपलब्ध जलसाठा टिकवून ठेवण्यासाठी जलसंपदा विभागाने जिल्‍ह्यातील ३४ बंधारे (केटीवेअर) दुरुस्‍तीसाठी ३२ कोटी रुपयांचा प्रस्‍ताव पाठविला आहे. हे बंधारे दुरुस्‍तीसह मजबुतीकरणासाठी निधीची मागणी केली आहे.

‘अल-निनो’मुळे पाऊस गायब झाला आहे. एकूण सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण घटल्‍याने राज्‍यात मोठ्या प्रमाणात दुष्‍काळी स्‍थिती निर्माण झाली आहे. यामुळे सरकारने धरणांतील पाणी साठ्यात दहा टक्‍के कपात करून राखीव ठेवण्‍याचे आदेश दिले आहेत. दुष्‍काळाच्‍या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने कंबर कसली आहे. जिल्ह्यातील ३४ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची गळती रोखणे, बळकटीकरण, दुरुस्ती आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ३२ कोटी १७ लाख रुपयांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्यात आला आहे.

कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तर) च्‍या कार्यकारी अभियंता ज्‍योती देवकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास नियोजन यांच्याकडे हा प्रस्ताव पाठविला आहे. यामध्ये वारणा, पंचगंगा, कडवी, कासारी, तुळशी आदी नदी व प्रकल्पांवरील बंधाऱ्यांचा समावेश आहे. वारणा उजवा कालवा स्वच्छता, हेड रेग्युलेटरच्या गेटची दुरुस्ती, बंधाऱ्यांमधील गळती रोखणे, लोखंडी बरगे बसविणे, तसेच कमकुवत झालेल्या बंधाऱ्यांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. पंचगंगा नदीवरील शिरोळ, तेरवाड आणि रूई या बंधाऱ्यांच्या विशेष दुरुस्ती व बळकटीकरणासाठी स्वतंत्र निधी प्रस्तावित केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.