आजरा तालुक्यात ढगफुटीसद‍ृश पाऊस | पुढारी

आजरा तालुक्यात ढगफुटीसद‍ृश पाऊस

आजरा ः पुढारी वृत्तसेवा आजरा शहरासह तालुक्याला सोमवारी दुपारी ढगफुटीसद‍ृश पावसाने झोडपले. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. अचानक आलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची धावपळ झाली. शहरातील संभाजी चौकात प्रचंड पाणी साठले होते.

गेले काही दिवस तालुक्यात रिमझिम स्वरूपात पावसाची हजेरी आहे. गेले दोन दिवस तर पूर्णतः उघडीप होती. तसेच हवेत उष्णतेचे प्रमाण वाढले होते. सोमवारी सकाळी 11 पासून ढगाळ वातावरण होते. दुपारी 12 ते 1 या दरम्यान ढगफुटीसद‍ृश पावसाने झोडपले. मात्र गेले काही दिवस पावसाच्या प्रतीक्षेत असणार्‍या बळीराजाला दिलासा मिळाला.

Back to top button