स्वरमेघातील भक्तिरसाच्या आज बरसणार सरी | पुढारी

स्वरमेघातील भक्तिरसाच्या आज बरसणार सरी

कोल्हापूर ः पुढारी वृत्तसेवा श्रावणात स्वरमेघाच्या भक्तिरसांमधील सुरांच्या सरी आज गुरुवारी (दि. 25) बरसणार आहेत. भक्तिभावाच्या फुलणार्‍या या नव्या ऋतूत हृदयाला साद घालणार्‍या गीतांमधून गानरसिकांच्या मनावर मोहिनी घालण्यात येणार आहे. निमित्त आहे, दै. ‘पुढारी’ आयोजित ‘भाव भक्तीचा गंध सुरांचा’ या सांगितीक मैफिलीचे. कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक सायकल अगरबत्ती असणार आहेत.

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे सायंकाळी 6.30 वाजता सुरू होणार्‍या या कार्यक्रमातून आपल्या अमृतमय वाणीने ‘टिकटिक वाजते’ फेम सायली पंकज आणि ‘कितीदा नव्याने तुला आठवावे’ फेम संगीतकार मंदार आपटे रसिक श्रोत्यांना तृप्त करणार आहेत. त्यांच्या स्वरांना जीवनगाणे वाद्यवृंदाची साथ लाभणार आहे.

श्रवणीय आणि नेत्रसुखद कार्यक्रमात संगीतातील विविध राग, भावगीत ते चित्रपटांतील गीते तन्मयतेने सादर केली जाणार असून यामुळे रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध होतील, यात शंका नाही. या कार्यक्रमासाठीच्या प्रवेशिका मर्यादित असून टोमॅटो एफ. एम. कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत त्या उपलब्ध होतील. अधिक माहितीसाठी 9404077990 या क्रमांकावर संपर्क साधावा.

श्रावण महिन्यापासून सणासुदीच्या दिवसांना प्रारंभ होतो. आता लवकरच बाप्पाचे आगमन होणार आहे. अशा मंगलमय वातावरणाला अगरबत्ती, धूप, कापूर यांच्या मिश्र सुवासाने निर्माण होणारा माहोल मनाला शुभकार्याची जाणीव करून देतो. वर्षानुवर्षे आपल्या घरातील मंगलकार्यांना ज्या अगरबत्तीने अशाप्रकारे सुगंधी करून सोडले, ती सायकल ब—ँड अगरबत्ती. 1948 मध्ये उदयास आलेले सायकल ब्रँड आजअखेर घराघरांत प्रसन्न वातावरणनिर्मिती करत आहे.

Back to top button