कोल्हापूर : तीन हजार पेन्शन द्या | पुढारी

कोल्हापूर : तीन हजार पेन्शन द्या

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा दिव्यांगांना तीन हजार रुपये पेन्शन द्या, यासह अन्य मागण्यांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज दिव्यांग संस्था (संघटना) कोल्हापूर यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यानंतर विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांना दिले.

दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे, विनाअट दिव्यांगांना अंत्योदय कार्ड मिळावे, संजय गांधी निराधार योजना (पेन्शन ) दिव्यांगांच्या मुलांची 25 वर्षे वयाची अट रद्द करून दरमहा 3 हजार रुपये पेन्शन मिळावी, आदी मागण्या आहेत. आंदोलनात अपंग बेरोजगार व पुनर्वसन संस्था कोल्हापूर, अपंग निर्वाह संस्था, हुपरी, नवजीवन अपंग पुनर्वसन संस्था हसूर, दिव्यांग सेना कोल्हापूर, क्रांती फाऊंडेशन कोल्हापूर, आस्था अपंग संस्था शाहूवाडी, विकलांग सेवाभावी संस्था नांदणी, राष्ट्रीय अपंग विकास महासंघ कोल्हापूर, चंदगड तालुका दिव्यांग पुनर्वसन संस्था चंदगड आदी सहभागी झाले होते. शिष्टमंडळात संजयसिंह जाधव, बाजीराव वारंग, अजित कदम, संदीप दळवी यांचा समावेश होता.

Back to top button