संशोधक विद्यार्थिनींसाठी विद्यापीठात नवीन वसतिगृह उभारण्याचा निर्णय | पुढारी

संशोधक विद्यार्थिनींसाठी विद्यापीठात नवीन वसतिगृह उभारण्याचा निर्णय

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा शिवाजी विद्यापीठाने व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेनुसार संशोधक विद्यार्थिनींसाठी नवीन वसतिगृह उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थिनींना प्रोत्साहन व संशोधनास चालना मिळणार आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रात 275 महाविद्यालये असून, विद्यार्थीसंख्या सुमारे 2 लाख 50 हजार आहे. मुलींचे पदव्युतर शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. त्यात दिवसेंदिवस संशोधक विद्यार्थिनींची संख्या वाढत आहे.

सद्यस्थितीत कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात येणार्‍या विद्यार्थिनींना राहण्याची सोय नाही. त्यातच आहे त्या मुलींच्या वसतिगृहात जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे विद्यापीठाकडून संशोधक विद्यार्थिनींसाठी 50 क्षमतेचे नवीन वसतिगृह उभारले जाणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाली असून, लवकरच बांधकामास सुरुवात होणार आहे. संशोधक विद्यार्थिनींचे नवीन वसतिगृह उभारल्याने बाहेरील जिल्ह्यांतून खास संशोधन करण्यासाठी विद्यापीठात येणार्‍या मुलींची राहण्याची सोय होणार आहे.

Back to top button