राष्ट्रगीत अवमान प्रकरण अंतिम टप्प्यात | पुढारी

राष्ट्रगीत अवमान प्रकरण अंतिम टप्प्यात

कोल्हापूर ः पुढारी वृत्तसेवा कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहात फेब्रुवारी 2006 मध्ये सभा सुरू असताना नगरसेवकांकडून राष्ट्रगीताचा अवमान झाला होता. त्याप्रकरणी मेजर संजय शिंदे यांनी फौजदारी कोर्टात दाखल केलेला खटला आता अंतिम टप्प्यात आला आहे. यामध्ये मे. ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग-1 यांच्यासमोर खटल्याची सुनावणी सुरू आहे.

मेजर शिंदे यांनी 56 पुरुष नगरसेवकांविरुद्ध फौजदारी न्यायालयात दाद मागितली होती. त्यातील पाच नगरसेवक मयत झाल्याने आता हा खटला 51 माजी नगरसेवकांच्या विरुद्ध चालू आहे. सर्व नगरसेवक तारखेस गैरहजर असल्यामुळे मे. ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग-1 यांनी सर्व 51 आरोपी नगरसेवक विरुद्ध प्रत्येकी पाच हजारचा जामीनपात्र वॉरंट काढण्याचा हुकूम जारी केला आहे. पुढील सुनावणी 8 सप्टेंबरला होणार आहे.

Back to top button