Annapurna Base Camp | अन्नपूर्णा बेस कॅम्प मोहीम यशस्वी...

खुशी कांबोजच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरच्या २८ गिर्यारोहकांचा सहभाग
कोल्हापूर : हिमालयातील अन्नपूर्णा बेस कॅम्पवर यशस्वी चढाई करणारे कोल्हापूरचे गिर्यारोहक.
कोल्हापूर : हिमालयातील अन्नपूर्णा बेस कॅम्पवर यशस्वी चढाई करणारे कोल्हापूरचे गिर्यारोहक.
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : नेपाळमधील हिमालयाच्या कुशीत वसलेल्या अन्नपूर्णा बेस कॅम्पपर्यंत (१३ हजार ५०० फूट) यशस्वी मजल मारत कोल्हापूरच्या २८ साहसी ट्रेकर्सच्या समूहाने उल्लेखनीय कामगिरी केली.

अनुभवी गिर्यारोहिका खुशी कांबोजच्या नेतृत्वाखाली समिट ॲडव्हेंचर्सच्या नियोजनातून आयोजित करण्यात आलेली ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण झाली. दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातून एवढ्या मोठ्या ग्रुपने ही पहिलीच मोहीम यशस्वी केली. शारीरिक क्षमता, मानसिक तयारी आणि संघभावना यांची कसोटी पाहणारी ही मोहीम आहे.

सहभागी गिर्यारोहक...

ॲड. सुजाता गुंड-पाटील, सई पाटील, पल्लवी चिप्रे, तनिषा चिप्रे, केतना गावडे, स्वाती ढवळे, कल्पना थोरात, सुश्मिता पंडित, मिताली महाराज, डॉ. सुमती कुलकर्णी, डॉ. संजय कुलकर्णी, डॉ. प्रीती मेहता, डॉ. राजेंद्र मेहता, प्राची राठोड, राहुल राठोड, हर्षवर्धन राठोड, डॉ. शैलेंद्र नवरे, डॉ. अमोल कोडोलीकर, डॉ. सुहास बडवे, सागर कामते, अभिजित भोसले, नरेश शिंगाडे, संजय भगत, विशाल पाटील, अभय मोरे, अनिल थोटे, अंकुश तेलंगे, हिरण्य प्रभावळकर. ग्रुप लीडर खुशी कांबोज.

मितालीची भरतनाट्यम्‌ची वंदना

शून्य अंश सेल्सिअस तापमानाच्या अत्यंत थंड आणि प्रतिकूल वातावरणात, सूर्योदयाच्या मंगलमय क्षणी मिताली महाराज यांनी भरतनाट्यम्‌ सादर करून आपली कला अन्नपूर्णा पर्वतरांगांना समर्पित केली. पावलांतील लय, मुद्रांमधील भाव आणि नृत्यातून व्यक्त होणारी श्रद्धा यांद्वारे मितालीने अन्नपूर्णा शिखराला कलात्मक वंदनच अर्पण केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news