कोल्हापूर : ‘एनआयए’च्या छाप्यानंतर संतप्त जमावाकडून ‘लब्ब्याक इमदाद’च्या कार्यालयाची तोडफोड | पुढारी

कोल्हापूर : 'एनआयए'च्या छाप्यानंतर संतप्त जमावाकडून 'लब्ब्याक इमदाद'च्या कार्यालयाची तोडफोड

रेंदाळ : पुढारी वृत्तसेवा : येथील अंबाईनगरमध्ये राहणाऱ्या इरशाद व अलताफ शेख या सख्ख्या भावांना दहशतवादी संघटनेशी कनेक्शन असल्याच्या संशयावरून राष्‍ट्रीय तपास संस्‍थेच्‍या (एनआयए) पथकाने चौकशीसाठी आज (दि.३१) ताब्यात घेतले आहे. या घटनेवरून जमाव संतप्त झाला असून, जमावाने त्यातील संशयित इरशाद याच्या लब्ब्याक इमदाद फाउंडेशनच्या कार्यालयाची तोडफोड केली. घटनास्थळी स.पो.नि. पंकज गिरी यांच्यासह पोलीस फौज दाखल झाला आहे.

दरम्यान, दहशतवादी संघटनांशी कनेक्शन असल्याच्या संशयावरून एनआयए (राष्ट्रीय तपास संस्था) वरिष्ठ अधिकारांचे पथकाने कोल्हापूर जिल्ह्यात हुपरी परिसरात रविवारी मध्यरात्री छापा टाकून दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कोल्हापूर परिसरातील गोपनीय ठिकाणी त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे या छापेमारीमुळे कोल्हापूर जिल्हासह पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड खळबळ माजली आहे.

 राष्ट्रीय तपास संस्थेने राज्यात 13 ठिकाणी काही संशयित तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर आणि नांदेड येथील छापा कारवाईचा समावेश आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button