

कोल्हापूर: पुढारी वृत्तसेवा : भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री सरस्वती बच्चू पाटील (वय ९१) यांचे कोल्हापूर येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने आज (दि.२४) निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, २ मुली (सातारा, आजरा) असा परिवार आहे. पार्थिव देहावर आज (दि. २४) रात्री ८.३० वाजता कोल्हापूर येथील पंचगंगा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आईंनी सर्व मुलांवर स्वाभिमानाने आणि मेहनतीने जगण्याचे संस्कार केले. या संस्कारांच्या शिदोरीवर पाटील आणि त्यांचे सर्व कुटुंब आयुष्यभर वाटचाल करत आहे.
हेही वाचलंत का ?